हार्ट अटॅकमुळे नाही तर ही गोष्ट गिळल्यामुळे करिश्माच्या पूर्व पतीचा मृत्यू, कारण वाचून धक्का बसेल…


मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती संजय कपूरच निधन झालं आहे. संजय कपूर ५३ वर्षांचा होता. गुरुवारी रात्री त्याच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे. . पोलो सामन्यादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने संजय कपूरने अखेरचा श्वास घेतला.

त्याच्या अकस्मात मृत्यूमुळे कुटुंबीय आणि मित्रमंडळींना मोठा धक्का बसला आहे. दिवंगत संजय कपूरच्या अनेक मित्रांनी सोशल मीडियावर त्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

सूत्रांनी सांगितले की, संजय कपूर गार्ड्स पोलो क्लबमध्ये पोलो खेळत असताना अचानक त्याला गुदमरल्यासारखे वाटले. त्याने खेळ थांबवण्याची विनंती केली आणि नंतर तो मैदानाबाहेर गेला. रिपोर्टनुसार, संजय कपूरने मधमाशी गिळली होती आणि त्याच्या घशात दंश झाल्यामुळे हृदयविकाराचा झटका आला.

संजय कपूर हा नामवंत उद्योगपती होता. तो सोना कॉमस्टारचा चेअरमन होता आणि भारतीय ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीच्या लीडर्समध्ये त्याची गणती व्हायची. त्याला पोलो खेळण्याची खूप आवड होती, तसेच तो सोना पोलो संघाचा मालक होता आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेत त्याने या खेळात सक्रिय सहभाग घेतला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!