कराड हादरलं! आई शेजारी जेवणासाठी मदत करायला गेली अन मुलीसोबत घडलं भयंकर….

पुणे : सातारा जिल्ह्यातील कराड शहरात एका अठरा वर्षाच्या तरुणाने साडेचार वर्षाच्या मुलीला घरी नेऊन त्याच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची आई शेजारच्या घरी आखाडी जेवणासाठी मदत करायला गेली होती. तिने मुलीलाही सोबत नेले होते. आई कामात व्यस्त असताना मुलगी खेळायला घराबाहेर गेली. त्याचवेळी आरोपीने तिला आपल्या घरी नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. रक्तस्त्राव झाल्यामुळे हा प्रकार मुलीच्या आईच्या लक्षात आला. या प्रकरणामुळे गावात संतापाची लाट पसरली असून संतप्त नागरिकांनी आरोपीला चांगलाच चोप दिला.याप्रकरणी आरोपीवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलीच्या आईने कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. पीडित मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

