अटकेत कराड, पुण्यानंतर सोलापुरात घबाड; दुसऱ्या बायकोची डोळे दिपवणारी संपत्ती, पुराव्याने उडाली खळबळ..


सोलापूर : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात अटकेत असलेला वाल्मिक कराड सध्या सीआयडीच्या कोठडीत आहे. देशमुख हत्या प्रकरणात त्याचा सहभाग तपासला जात आहे. आरोपी वाल्मिक कराडनं कोट्यवधी रुपयांची बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप होत आहे.

कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावे पुण्यापाठोपाठ सोलापुरातही शेतजमीन असल्याची माहिती आता उघडकीस आली आहे. खंडणीसारख्या प्रकरणांमधूनच कराडनं ही काळी माया जमवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव यांच्या नावावर सोलापूर जिल्ह्यात कोट्यावधी रुपयांची संपत्ती आहे. बार्शी तालुक्यातील शेंद्री गावात ज्योती मंगल जाधव यांच्या शेतजमिनी असल्याची माहिती हाती आली आहे. बार्शी तालुक्यातील शेंद्री गावात ज्योती मंगल जाधव यांच्या नावावर 4 जमिनीचे सातबारा असल्याचे ट्विट सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया यांनी केले होते.

बार्शीतल्या शेंद्री गावात एकूण चार शेतजमिनी ज्योती जाधव यांच्या नावे खरेदी करण्यात आल्या आहेत. या जमिनींचे क्षेत्रफळ साधारण 35 एकर इतके आहेत. तर अंदाजे मूल्य हे सुमारे दीड कोटी रुपये इतके आहे.

दोन वर्षात कालावधीत चारही जमिनी खरेदी करण्यात आल्या आहेत. या आधी ज्योती मंगल जाधव यांच्या नावे पुण्यात दोन ऑफिस स्पेसेस आणि तीन फ्लॅट खरेदी केल्याचं समोर आलेलं होतं. त्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत कोट्यावधी रुपयांची शेतजमीन खरेदी केल्याचे दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी ज्योती जाधवच्या पुण्यातील संपत्तीची माहिती उघडकीस आली. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजसमोर जाधवच्या मालकीच्या २ कार्यालयीन वापरासाठीच्या जागा आहेत. याशिवाय हडपसरमधील ऍमनोरा टाऊनशीपमध्ये तिच्या नावावर दोन सदनिका आहेत. याशिवाय खराडीत १ सदनिका आहे. इतकी संपत्ती खरेदी करण्यासाठी ज्योती जाधवकडे पैसा आला कुठून असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!