Kangana Ranaut : कंगना रणावतला कानाखाली मारणारी कुलवींदर कौर आहे तरी कोण? सगळ्या देशात सुरूय चर्चा, तिच्यावर कारवाई पण झाली, नेमकं प्रकरण काय?

Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना राणावत हिच्याबद्दल एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कंगना राणावत नुकतीत लोकसभा निवडणुकीत जिंकून आली आहे. हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघात तिचा विजय झाला आहे. यानंतर कंगना काल दिल्लीसाठी रवाना होत असताना तिच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे.
कंगना राणावत दिल्लीला जाण्यासाठी चंदीगड विमानतळावर दाखल झाली असता तिथे येतात एका सीआयएसएफ च्या महिला कर्मचाऱ्याने तिला कानशिलात लगावली. या घटनेनंतर कंगना भडकली वतीने या महिला कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी केली त्यानंतर तातडीने या महिला कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.
कुलविंदर कौर असे या महिला जवानाचे नाव असून ती केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहे. गेल्या दोन वर्षापासून ती चंदीगड विमानतळावरती कार्यरत असून, तिने कंगणाला कानशिलात का लगावली? याची बरीच चर्चा सुरू आहे. कंगना राणावतने काही महिन्यांपूर्वी दिल्लीत जे शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते, त्यामध्ये या आंदोलनात शंभर रुपये भाड्याने महिला आणल्या होत्या असं वक्तव्य केलं होतं. Kangana Ranaut
तेव्हापासून पंजाब आणि हरियाणामधील शेतकऱ्यांमध्ये या वक्तव्याची चीड आहे. त्यावरूनच राग मनात धरून कुलविंदर कौर हिने तिला कानफटात लगावली असे बोलले जात होते, परंतु कुलविंदर कौर हिच्या भावाने मात्र माध्यमांपुढे येत वेगळीच माहिती दिली आहे. कंगना राणावत विमानतळावर असताना तिची पर्स चेक करताना झालेल्या बाचाबाचीतून हा प्रकार घडला असे सांगितले जात आहे.
ही तपासणी सुरू असताना कंगना हिने आपण खासदार आहोत, आता तपासणी करू नये अशा स्वरूपाची मागणी केली होती. मात्र शासकीय सुरक्षेचे कारण सांगत ही तपासणी गरजेचे असल्याचे सांगत कुलविंदर कौर हिने तपासणी सुरू ठेवली आणि यातच बाचाबाची झाली. बोलघेवड्या कंगना कडून अतिरिक्त शब्द गेल्यानेच हा प्रकार घडला असावा असा दावा कुलविंदर हिचा भाऊ शेरसिंह मालिवाल यांनी केला आहे. आम्ही कुटुंबीय कुलविंदर हिच्या बाजूने आहोत आणि तिची काही चूक नाही असे मत तिच्या भावाने व्यक्त केले आहे.
कुलविंदर कौर कोण आहे?
कुलविंदर कौर व तिचे पती दोघेही सीआयएसएफ मध्ये आहेत. तब्बल पंधरा वर्षाची तिची नोकरी असून या नोकरीदरम्यान तिची वर्तणूक अत्यंत चांगली आहे. चांगली वर्तणूक असणाऱ्या महिला जवानांमध्ये तिचा समावेश असून, ३५ वर्षीय कुलविंदर पंजाब मधील कापूरथला जिल्ह्यातील सुलतानपूर लोधी येथील रहिवासी आहे. गेल्या दोन वर्षापासून ती चंदीगड विमानतळावर कार्यरत आहे. घटनेनंतर तिला निलंबित करण्यात आले आहे.