Kangana Ranaut : बागेश्वर बाबांना मिठी मारायची होती पण…! कंगना राणावतचे मोठे वक्तव्य..


Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असते. तीच्या वक्तव्यांमुळे ती खुपदा अडचणीत सापडली आहे. तसेच कंगना रनौत सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

काल कंगनाने अयोध्येमध्ये बागेश्वर बाबांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर कंगनाने बागेश्वर बाबांसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यामुळे सध्या कंगना चर्चेत आली आहे.

कंगनाने सोशल मीडियावर बागेश्वर बाबांसोबतचे फोटो पोस्ट करत लिहिले की, “पहिल्यांदा माझ्यापेक्षा कमी वयाच्या गुरुजींना मी भेटले. माझ्यापेक्षा ते जवळपास दहा वर्षांनी लहान होते. माझ्या मनात त्यांना छोट्या भावासारखा मिठी मारण्याची इच्छा होती.

मात्र नंतर लक्षात आलं की कोणी वयाने गुरु बनत नाही तर कर्माने गुरुचा मान मिळतो. गुरूंचे चरण स्पर्श करत मी त्यांचा आशीर्वाद घेतला. जय बजरंगबली” अशी कंगनाने पोस्ट केली आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेचा विषय ठरत आहे.

दरम्यान, अयोध्येमध्ये काल मोठ्या थाटामाटात प्रभू श्री राम मंदिरांचे उद्घाटन झाले आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे उद्घाटन झाले आहे. यावेळी देशभरातील अनेक दिग्गज व्यक्तींनी यामध्ये हजेरी लावली. राजकीय व्यक्ती, सेलिब्रेटी, उद्योगपती या सर्वांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली यामध्ये कंगना रनौतचा देखील समावेश होता. Kangana Ranaut

काल प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठान सोहळ्यासाठी कंगना खूप उत्साही असल्याचे दिसत आहे कारण कंगनाचे अनेक व्हिडिओ फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर कंगनाने तिथल्या साधुसंतांची ही भेट घेतली भागेश्वर धाम सरकार म्हणजे नरेंद्र कृष्णा शास्त्री यांच्या भेटीनंतर तिने लगेच फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!