Kalyan Crime News : ‘ते’ करण्यास नकार दिल्याने प्रियकर संतापला, रागाच्या भरात प्रेयसीला संपवलं, उडाली खळबळ…

Kalyan Crime News : कल्याण स्टेशन परिसरातील तृप्ती लॉजमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी महिलेच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या. तपासा दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे.
भूपेंद्र गिरी असे अटक करण्यात आलेल्या प्रियकर आरोपीचे नाव आहे.
मयत महिला ज्योती तोरडमध्ये आणि भूपेंद्र गिरी यांचे गेल्या पाच वर्षापासून प्रेम संबंध होते. मात्र ज्योती भूपेंद्र सोबत राहण्यास तयार नव्हती. त्यामुळे संतापलेल्या भूपेंद्रने ज्योतीची लॉजमध्ये गळा आवळून हत्या केली.
मिळालेल्या माहिती नुसार, कल्याण पश्चिमेतील तृप्ती लॉजमध्ये ज्योती तोरडमल हिचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरु केला.
डीसीपी सचीन गुंजाळ, एसीपी कल्याणजी घेटे, वरिष्ठ पालिस निरिक्षक शैलेश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु केला. आरोपी भुपेंद्र गिरीचा शोध सुरु केला. भूपेंद्र आणि ज्योती शनिवारी ३ वाजता तृप्ती लॉजमध्ये आले होते.
रविवारी सकाळी ज्योती हिचा गळा आवळून भुपेंद्र हा पसार झाला होता. लॉजमधील मोबाईल नंबर पोलिसांना मिळाला होता. तांत्रिक पद्धतीने तपास करुन पोलिसांनी भूपेंद्र याचा पाठलाग सुरु केला. सोलापूर उस्मानाबाद हायवेवर तो एका ठिकाणी सापडला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
ज्योती आणि भूपेंद्र यांचे पाच वर्षापासून प्रेमसंबंध होते. भूपेद्र हा विवाहित होता. त्याचा पत्नीचा मृत्यू झालेला आहे. ज्योती देखील एका व्यक्तीसोबत कल्याण पूर्वेत राहते. जेव्हा ज्योती भूपेंद्रला भेटण्यासाठी तृप्ती लॉजमध्ये आली.
तेव्हा त्याने तिच्याकडे एक अट ठेवली. तू माझ्यासाेबत चल आणि माझ्यासोबत राहा. परंतू ज्योती तयार नव्हती. या कारणावरुन दोघांचा वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की त्याने ज्योतीचा गळा आवळला. त्यानंतर तोंडावर उशी ठेवून तिला जीवे ठार मारले. याप्रकणी आरोपीला अटक करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.