Kalicharan Maharaj : जगातील सर्व सुंदर बाया भोगून घ्या!! कालीचरण महाराजांचे धक्कादायक वादग्रस्त वक्तव्य…


Kalicharan Maharaj : जगातील सर्व सुंदर बाया भोगून घ्या, सर्व भोगून घ्या, चांगल्या फुलाचा वास घ्या. नाकाचा सुगंध घ्या. हा सर्व आनंद संपून जाईल. मात्र ईश्वराचा आनंद संपणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केले आहे. यामुळे आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

नाशिकमध्ये भद्रकाली परिसरातील साक्षी गणेश मंदिर परिसरात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती निमित्ताने कालीचरण महाराजांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कालिचरण महाराजांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

कालीचरण महाराज म्हणाले की, मी मराठी हिंदी इंग्रजी भाषेत बोलतो. पण माझे शिक्षण झालेले नाही. मी शाळा शिकलेलो नाही, अंगुठा छाप आहे. मला एक पत्रकार भेटले आणि बोलले आपण माणूस म्हणून जगू शकत नाही. ज्यात धर्म नाही तो ढोर आहे. Kalicharan Maharaj

खाणे, पिणे, झोपणे हे पशुचे लक्षण आहे. पशू करतो तेच माणूसही करतो. भारत हिंदू राष्ट्र झाले काय? आपले मंदिर फोडले ते पुन्हा झाले पाहिजे का? लव्ह जिहाद बंद झाले पाहिजे का? त्यावर कठोर कायदा झाला पाहिजे का? 88 हजार महर्षी लोक आहे. त्यामध्ये एक माझे गुरू आहे. त्यांनीच श्रीरामाला धनुष्य दिले होते, असे त्यांनी म्हटले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!