“श्रीगोंद्याची माणसे माझ्या रक्ताची व मातीची आहे” माझ्या लहान भावाला निवडून द्या म्हणून ज्योतिरादित्य सिंदिया यांनी श्रीगोंद्याचे मैदान गाजविले….


श्रीगोंदा : श्रीगोंदा मतदार संघामधून भाजपच्या माध्यमातून महायुतीचे उमेदवार म्हणून विक्रम पाचपुते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सध्या त्यांनी प्रचारात वेग घेतला असून त्यांच्या प्रचारार्थ केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे प्रचार सभा पार पडली. यावेळी ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सभेत बोलताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.

यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, श्रीगोंद्यातील माती आणि माणसे माझ्या रक्तातील आहेत व शिंदेशाहीची सुरुवात याच नगरीतून झाली. आमच्या शिंदे घराण्याची राजकारण करण्याची नव्हे तर सेवेची भावना असून सध्या श्रीगोंदा मध्ये निवडणूक नसून हे तर युद्ध आहे व या युद्धात माझा लहान भाऊ विक्रम पाचपुते उभा असून माझ्या या भावाला या युद्धात साथ द्या अशा प्रकारचे आवाहन केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या निमित्ताने मतदारांना केले.

त्यामुळे या लढाईत माझ्या लहान भावाला साथ द्या अशा प्रकारचे आवाहन केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केले. या सभेवेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच आमदार बबनराव पाचपुते, सुरेंद्र गांधी, दिलीप भालसिंग तसेच सचिन जगताप, संदीप नागवडे, भगवान पाचपुते तसेच दादासाहेब जगताप, बाळासाहेब महाडिक इत्यादी सह इतर मान्यवर उपस्थित होते.

सिंधीया यांनी म्हटले की, बबनराव पाचपुते यांनी सामान्य माणसाचा आवाज बनून विकासाला दिशा दिली. भाजपने विक्रम च्या आईला तिकीट दिले होते व आईने तिकीट मुलाला दिले.

विक्रमच्या शब्दांमध्ये आणि विचारांमध्ये परिपक्वता असल्याचे देखील त्यांनी म्हटले. तसेच या सभेदरम्यान बोलताना विक्रम पाचपुते यांनी म्हटले की, तिकिटाकरिता आम्ही आईला पाठवले पण तिने नकार दिला व त्यामुळे मला संधी मिळाली.

अडीच वर्षात आम्ही सर्वात जास्त निधी आणला व तुम्ही फक्त आता एक संधी द्या, विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशा प्रकारचे आवाहन देखील विक्रम पाचपुते यांनी बोलताना केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!