फक्त दिल्लीला गेलो नाही एवढंच सांगा! अजित पवारांनी निकालानंतर दिली मिश्किल प्रतिक्रिया
मुंबई : काल सुप्रीम कोर्टाने मोठा निकाल दिला. यामुळे एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. असे असताना गेल्या काही दिवसांपासून अजित पवार भाजपात जाणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र अजित पवार यांनी या केवळ चर्चा असल्याचे म्हणत आहेत.
काल आलेल्या निकालावर अजित पवार यांनी या निकालावर प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. दिल्लीला गेलो नाही एवढंच सांगा, अशी मिश्कील टिप्पणी नेहमीप्रमाणे आजित पवार यांनी केली आहे.
अजित पवार म्हणाले, मी जोपर्यंत संपूर्ण निकाल वाचत नाही तोपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. साताऱ्यात मी जे बोललो होतो ते झालं एवढं मात्र नक्की असं म्हणत अजित पवार माध्यमांसमोरुन निघाले आणि गाडीत जाऊन बसले.
असे असताना मात्र जाताना अजित पवार यांनी नेहमी प्रमाणे त्यांच्या स्टाईलमध्ये टिप्पणी केली आहे. मी फक्त दिल्लीला गेलो नव्हतो एवढं सांगा’, असं ते म्हणाले. यामुळे हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.