राजीव गांधींची हत्या केली तशीच…!! अजितदादांच्या अपघातावर खळबळजनक दावा..


पुणे : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला आता जवळपास एक महिना पूर्ण होत आहे. २८ जानेवारी रोजी अजित पवार मुंबईहून बारामतीच्या दिशेनं येत होते. दरम्यान, बारामती विमानतळाजवळ त्यांचं विमान कोसळलं. या विमान अपघातात अजित पवारांसह एकूण पाच जणांचा दुर्दैवी अंत झाला.

आजही लोकांना विश्वास बसत नाही की, अजित पवार आपल्यात नाहीत. आज राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. राज्याचा हा अर्थसंकल्प अजित पवार मांडणार होते, या अर्थसंकल्पाची तयारीही ते मागील काही दिवसांपासून करत होते.

अजित पवारांचा अपघात नव्हे तर घातपातच झाला, असा दावा अनेक नेत्यांकडून करण्यात येत आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी तर पत्रकार परिषद घेऊन खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी अपघाताबाबतच्या अनेक त्रुटी पुराव्यांसह पत्रकार परिषदेत मांडल्या आहेत.

त्यांनी व्हीएसआर विमान कंपनीवर देखील विविध प्रकारचे आरोप केले. यादरम्यानच अमोल मिटकरी यांनी अत्यंत खळबळ उडवणारा दावा केला. अमोल मिटकरी यांनी म्हटले की, अजित पवार यांच्या विमान अपघातावेळी पायलट सुमित कपूर हा ,सुसाईड बॉम्बर होता का? लिट्टेने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या केली तशीच किंवा त्याप्रकारेच अजित पवार यांची हत्या झाली का? सुमित कपूर यांच्या पत्नी सुमित हा जिवंत असल्याचे म्हणताना दिसत आहेत.

मग खरोखरच विमान अपघातात सुमित कपूर यांचे निधन झाले का? असेही अमोल मिटकरी यांनी म्हटले. यासोबतच त्यांनी अजित पवार यांच्या विमानाचे अगोदरच ठरलेले पायलट साहिल मदन आणि कॅप्टन यश हे खरोखरच वाहतूककोडींत अडकले होते का? असाही थेट प्रश्न केला. ब्लॅक बॉक्सचे जाऊन द्या सध्या पण सीसीटीव्ही फुटेज का देत नाहीत, असेही अमोल मिटकरी यांनी म्हटले.

आता अमोल मिटकरी यांनी केलेल्या दाव्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्या विमानाचे सुरूवातीला ठरवून दिलेले दोन्ही पायलट कुठे आहेत? हा प्रश्न सध्या सातत्याने उपस्थित केला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!