Junnar News : धक्कादायक! बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, जुन्नरमधील घटना..


Junnar News : बिबट्याच्या हल्ल्यात आठवर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना आज पहाटेच्या सुमारास जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथे घडली आहे.

रुपेश तान्हाजी जाधव (वय.८) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

सविस्तर माहिती अशी की, रूपेशचे आजी-आजोबा तेजेवाडी येथील राजू शिंदे यांच्या विटभट्टीवर काम करतात. रुपेश हा आठदिवसांपूर्वी म्हैसगाव ता. राहुरी जि. अहमदनगर येथून सुट्टी साठी आजी आजोबा यांच्याकडे आला होता.

पहाटे ५ वाजता तो प्रातः विधीसाठी गेला असता जवळच दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घातली. त्यानंतर त्याला जवळच असलेल्या ऊसाच्या शेतात ओढत नेले. दरम्यान, रूपेशला सोडविण्यासाठी कुटुंबातील आणि आजूबाजूच्या नागरिकांनी आरडा-ओरडा केला. मात्र, बिबट्याच्या तावडीतून त्याची सुटका झाली नाही. Junnar News

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी प्रदिप चव्हाण पथकासह घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिक रेस्क्यूटीम आणि वनविभागाच्या टिमने मुलाचा कसून शोध घेतला. त्यावेळी नरभक्षक बिबट्याही त्यांना आढळून आला. सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मुलाचा मृतदेह ऊसाच्या शेतात सापडला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!