Junnar News : घृणास्पद! दहा वर्षाच्या मुलीशी ४२ वर्षांच्या पोलिसाचे अश्लील चाळे, संतापजनक घटनेने जुन्नर हादरले..
Junnar News पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात धक्कादायक घटना घडत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता एका पोलीस कर्मचाऱ्याने १० वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. Junnar News
नारायण भाऊसाहेब बर्डे (वय. ४२) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
हा पोलीस कर्मचारी सध्या पोलीस नाईक म्हणून जुन्नर तालुक्यातील ओतूर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. त्याच्याविरोधात नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (Pune Crime News)
मिळालेल्या माहिती नुसार, सोमवारी महात्मा गांधी जयंतीच्या दिवशीच (ता. २) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास या पोलिसाने हे घृणास्पद कृत्य केले. घृणास्पद कृत्य केल्यानंतर बर्डे हा एका खासगी रुग्णालयात दाखल झाला आहे.
दरम्यान या पोलीस कर्मचार्याच्या विरोधात नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे.