शेतीला नोकरीचा दर्जा आणि महिन्याला 10 हजार पगार, आता महत्वाची माहिती माहिती समोर…

बीड : सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदील झाला आहे. या भयानक परिस्थितीत शेतकऱ्यांना मदतीची आशा आहे. अशा काळात शेतकऱ्यांना काय-काय मदत करावी, याबाबत मनोज जरांगे पाटील यांनी विविध मागण्या केल्या आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत.

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची बीडच्या नारायणगड येथे सभा पार पडली. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा पार पडला. या मेळाव्याला मनोज जरांगे पाटील हे उपस्थित झाले. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं, तसेच यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर देखील जास्त भाष्य केलं. त्यांनी शेतीला नोकरीचा दर्जा देण्याची मागणी करत दर महिन्याला 10 हजार रुपये पगाराची मागणी केली आहे.
तसेच त्यांनी संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली आहे. ते म्हणाले राज्य ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी जाहीर करा. ज्या शेतकऱ्याने विदर्भातील, मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र आणि उर्वरित महाराष्ट्रातील शेतकऱ्याने आत्महत्या केली तर शेतकऱ्याच्या कुटुंबाला शासकीय नोकरी सरकारने द्यावी.

तसेच शेतीला नोकरीचा दर्जा द्या. जो 10 एकरचा आतला शेती करेल त्याला 10 हजार रुपये महिन्याला द्या. त्या पगारामुळे मुलं शेतात काम तरी करतील. शेती विकायची नाही. तसेच पिक विम्याला सरकारने तीन ट्रिगर बसवले आहेत. ते उठवायला पाहिजेत. पीकविमा द्यायचा. शेतकऱ्यांना न्याय देईपर्यंत मागे हटायचं नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हाले आहेत.
दरम्यान, या मागण्या दिवाळीपर्यंत पूर्ण केल्या नाहीत तर आपण सर्व शेतकऱ्यांना धाराशिव किंवा बीड जिल्ह्याच्या सीमेवर बोलवू किंवा जालना, संभाजीनगर, जळगाव, बुलढाणामध्ये बैठकीला बोलवू. नंतर जर मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर आंदोलन करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. यामुळे वातावरण तापले आहे.