उरुळीकांचन -सोरतापवाडी गटात जितेंद्र बडेकर यांचा विजय; सोरतापवाडी पंचायत समितीत सुदर्शन चौधरी यांचा विजय…

उरुळीकांचन : अणुसूचित जाती -जमातींसाठी आरक्षित असतानाही जिल्ह्यात सर्वाधिक चर्चेत आलेल्या उरुळीकांचन-सोरतापवाडी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र बडेकर यांनी अपेक्षेप्रमाणे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार शंकर बडेकर यांना १६०१ मतांनी धुळ चारीत विजय मिळविला आहे. उरुळीकांचन -सोरतापवाडी जिल्हापरिषद गटातील आतापर्यंत सर्वाधिक मोठा ठरला आहे. तर सोरतापवाडी पंचायत समिती गणात धक्कादायक निकालाची नोंद झाली आहे.

जिल्हा परिषद निवडणुकांचे पडघम सुरू असताना जिल्ह्यात सर्वाधिक चर्चेत या मतदारसंघाची नोंद झाली होती. त्यानुसार सोमवारी (दि.९) आंबेगाव ब्रुद्रुकच्या सिंहगड इन्स्टिट्यूट च्या सभागृहात झालेल्या मतमोजणीत अपेक्षेप्रमाणे उरुळीकांचन -सोरतापवाडी गटात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार जितेंद्र बडेकर यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार शंकर बडेकर यांच्यावर पहिल्या फेरीपासून मताधिक्य ठेवले होते. या गटात अंतिम सर्व फेऱ्यांत जितेंद्र बडेकर यांनी तब्बल मतांची आघाडी घेत सर्व भाजपने उभे केलेले आव्हान मोडीत काढले आहे.
तर सोरतापवाडी पंचायत समिती गणात बहुचर्चित भाजपचे सुदर्शन चौधरी यांच्या लक्षवेधी लढतीत ६६८ मतांनी राष्ट्रवादी चे आण्णा महाडीक यांचा पराभव झाला आहे. या गणात भाजपच्या बंडखोर उमेदवार पूजा सणस यांनी निर्णायक २३०८ मते मिळाली आहे. या गणात भाजपच्या सर्व वरिष्ठांनी उमेदवार यांच्या बाजूने ताकद उभी करण्याचा प्रयत्न केला होता.

दरम्यान, उरुळीकांचन पंचायत समिती गणात राष्ट्रवादी कॉंग्रेसने अतिशय साधारण कुटूंबातील कोमल गणेश कांबळे यांना उमेदवारी दिली होती. या गणात त्यांनी भाजपच्या भाजप ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्ष सारीका लोणारी यांचा तब्बल २६३५ मतांनी पराभव केला आहे.