Jio Service Down : जिओचं नेटवर्क झाले डाऊन, ग्राहकांना अनेक अडचणी, सोशल मीडियावर ग्राहकांच्या तक्रारी…

Jio Service Down : भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक रिलायन्स जिओचे नेटवर्क गेल्या तासाभरापासून ठप्प झाल्याच्या तक्रारी समोर येत आहे. त्यामुळे जिओ युजर्सना मोठ्या प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागतोय.
तर अनेकांनी याबाबत सोशल मिडीयावर पोस्ट करत रिलायन्स जिओला टॅग करून रिलायन्स जिओचं नेटवर्क गेल्या १ तासापासून डाऊन असल्याचे म्हणत संताप व्यक्त केला आहे. नेटवर्क डाऊन का झाले? अद्याप रिलायन्स जिओने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
त्यामुळे युजर्स नेटवर्क कधी सुरळीत होणार याबाबत सोशल मिडीयावर टॅग करून विचारणा करताना दिसताय. तर सोशल मीडियावर जिओ डाऊन हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. लोक या ट्रेंडमध्ये सहभागी होऊन जिओ आणि अंबानी यांना ट्रोल करतांना दिसत आहे. Jio Service Down
मुंबईत जिओचं नेटवर्क अचानक डाऊन झाल्याने सोशल मीडियातून नेटीझन्सने जिओसह अंबानींना ट्रोल केलंय. ट्विटरवर काहींनी पोस्ट करत जिओबद्दल अंबानींना ट्रोल करण्यास सुरुवात केली. तर, अनेकानी तक्रारी दाखल केल्या आहेत.
मुंबईत राहणाऱ्या अनेकांनी ट्विटरवर स्क्रीनशॉट शेअर करत जिओचं नेटवर्क गंडल्याचा पुरावाच दिला आहे. जिओचं नेटवर्क गायब झाल्याने ना फोन कॉल्स सुरू होते, ना इंटरनेट सेवा, त्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला.