सोरतापवाडीत अल्पवयीन मुलीचा हात पकडून बळजबरीचा ‘जिहादी’ प्रकार उघडकीस! आरोपी पोलिसांच्या ताब्यात; घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप…

उरुळीकांचन : सायकल खेळणाऱ्या अल्पवयीन मुलीला एकटं गाठून बळजबरीने तिचा हात पकडून बळजबरीचा ‘जिहादी’ धक्कादायक प्रकार सोरतापवाडी (ता.हवेली ) येथे रविवार (दि.९) रोजी घडलेला प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून घटनेमुळे परिसरात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.
साहिल सय्यद ( रा. माळवाडी, सोरतापवाडी, ता.हवेली , जि पुणे) असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर बालैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा बीएनएस ७४,७८, १२६(२), ३५१(२)३५१(३) कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
या नराधमाने अल्पवयीन मुलगी सायकलवर ऐकटी खेळत असल्याची संधी साधून तिचा हात पकडून तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यावर रविवार (दि.९) रोजी सायंकाळी ५.३० हा प्रकार घडला आहे. अल्पवयीन मुलगी सायकल चालवित असताना हा नराधम जवळ आला व त्याने तिचा हात पकडून तिला जवळ ओढण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्या मोबाईल ची चिठ्ठी देऊन बळजबरी करुन जिवे मारण्याची धमकी दिली आहे.
मुलगी घरी परतल्यानंतर मुलीने वडीलांना हा प्रकार सांगितल्याने घडलेला प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर ग्रामस्थांनी या आरोपीला पकडून पोलिसांच्या हवाली केला आहे. आरोपीवर कठोर कारवाई ची मागणी ग्रामस्थ करीत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उप निरीक्षक प्रविण कांबळे हे करीत आहे.
“पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली असून बाललैंगिक अत्याचार कलमान्वये आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. नागरीकांनी अशा घटना घडल्यास सतर्क राहून पोलिसांशी संपर्क साधावा’
-शंकर पाटील , पोलिस निरीक्षक