Jayant Patil : तुम्हारे पास गाडी, बंगला है, मेरे पास शरद पवार साहब है!! जयंत पाटील यांनी सभाच गाजवली, नेमकं काय घडलं?


Jayant Patil : शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेची इस्लामपूर येथे सांगता सभा संपन्न झाली. यावेळी अनेक नेते उपस्थित होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भाषणाची जोरदार चर्चा झाली. ते म्हणाले, मी नेहेमी म्हणत असतो. तुम्हारे पास गाडी, बंगला है, मेरे पास शरद पवार साहब है, असे म्हणत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

यावेळी जयंत पाटील म्हणाले, आज पावसाच्या वर्षावात शिवस्वराज्य यात्रेची इस्लामपूर येथे सांगता सभा संपन्न झाली. खरंतर या सभेला सांगता सभा न म्हणता प्रारंभ सभा म्हणावी असे मला प्रकर्षाने वाटते. कारण निवडणूक जाहीर झाल्यानंतरची ही पहिली सभा आहे. त्यामुळे हा प्रारंभ सत्ता परिवर्तनाचा आहे, विकसित महाराष्ट्राच्या नव्या पर्वाचा आहे. Jayant Patil

शिवनेरीच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज यांना नमन करून सुरू झालेली ही यात्रा अनेक अनुभव देऊन गेली. खासदर अमोल कोल्हे म्हणतात, शिवशंभूचा जागर करत असताना, मोठी तपस्या करावी लागते. मोठा संघर्ष करावा लागतो.” या यात्रेदरम्यान आपला पक्ष या संघर्षाला पूर्णपणे तयार झालेला आहे.

राज्याची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे. विकासाचा दर घटला आहे. निवडणुका आणि लाडकी खुर्ची डोळ्यासमोर ठेवून योजना आणल्या आहेत. आज कायदा आणि सुव्यवस्थेची अवस्था बिकट आहे. एक फुल आणि दोन हाफ नक्की करतात तरी काय? हा जनतेचा प्रश्न आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!