Jasprit Bumrah : फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा राडा! केला मोठा विक्रम…


Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहने शुक्रवारी चेन्नईच्या एम.ए. चिदम्बरम स्टेडियमवर खास विक्रमाला गवसणी घातली. फिरकीसाठी नंदनवन असलेल्या चेपॉकच्या मैदानात भारताच्या ताफ्यातील जलगती गोलंदाजीतील प्रमुख अस्त्र असलेल्या जसप्रीत बुमराहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४०० विकेट्सचा टप्पा पार केला. ज्या बांगलादेशच्या गोलंदाजाने भारतीय संघाविरुद्ध पंजा मारला त्या हसन महमूदला आउट करत बुमराहने ४०० चा टप्पा गाठला.

बुमराहची विक्रमाला गवसणी..

चेन्नईच्या मैदानातील कसोटी सामन्यात बांगलादेशच्या पहिल्या डावातील पहिल्या षटकातच बुमराहने पहिली विकेट घेतली होती. एका अप्रतिम चेंडूवर त्याने शादाम इस्लाम याला क्लीन बोल्ड करत या कसोटी सामन्यात आपल्या विकेटचे खाते उघडले.  Jasprit Bumrah

त्यानंतर मुशिफिकूर रहिमला त्याने लोकेश राहुलकरवी झेलबाद केले. विराट कोहलीच्या कॅचच्या मदतीने बुमराहने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात तिसरी विकेट मिळवली. यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने ४०० विकेट्सचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा तो भारताचा सहावा जलदगती गोलंदाज ठरला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!