जरांगे पाटलांचा फडणवीसांसह अजित पवारांना गंभीर इशारा; म्हणाले, 2029 साली महायुतीची सत्ता जाणार…

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नवी मुंबईत पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी माझ्या अंगावर गाडी घालण्याची सुपारी धनंजय मुंडेंनी दिल्याचा धक्कादायक दावा केला आहे.
यापूर्वीही काही आरोपींनी पोलिस चौकशीत मुंडे यांचे नाव घेतल्याचे सांगत जरांगेंनी सरकार आणि पोलिसांवर दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर आता धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई होत नसल्याने जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गंभीर इशारा दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी ठाण्यात बोलताना म्हटले की, घातपाताचा कट प्रकरणात पोलीसांना आरोपींनी जबाब दिला आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांना चौकशीसाठी बोलावलं जात नाही. अटक केली जात नाही. अजित पवार आणि फडणवीस यांच्यावरती शंका उपस्थित करणारा प्रश्न आहे. 100% धनंजय मुंडे त्यांच्या पायाखाली लोळला आहे.

जरांगे पाटील यांच्या चौकशी पासून टाळा अशी विनंती केली असेल. रश्मी शुक्ला यांना माझी विनंती आहे, जो घातपात करत असेल त्यांना वाचवू नका, फडणवीस साहेब तुम्ही या पापामध्ये सहभागी होऊ नका. मराठ्यांची लाट फडणवीस आणि अजित पवार तुम्ही घेऊ नका.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना इशारा देताना जरांगे पाटील म्हणाले की, मराठे फडणवीस आणि अजित पवार यांच्या विरोधात विरोधात गेले तर २०२९ हातातून जाऊ शकते. काँग्रेस पक्ष समुद्रासारखा होता त्याची देखील सत्ता गेली आणि भाजपची सत्ता आली त्यामुळे फडवणीस यांनी गर्वात राहायचं नाही.
ते असं जर करत राहिले तर सरकारला उतरती कळा लागणार. मराठे सोपे नाहीत, जीवाला जीव देणारे मराठे आहेत. धनंजय यांच्या पापात अजित पवार आणि फडणवीस सहभागी झाल्यामुळे यांच्या पक्षाचा सत्तेचा बळी जाऊ शकतो असे ते म्हणाले.
