मराठ्यांची दोन -तीन माकडे फडणवीसांकडे ! छगन भुजबळांना फडणवीसांनीच मंत्रीपद देऊ केलंय जरांगे पाटील केले फडणवीसांना टार्गेट ..!!


नांदेड : देवेंद्र फडणवीस छगन भुजबळांना बळ देतात हे आता जनतेच्या लक्षात आलं आहे. भुजबळांना यासाठीच मंत्रीपद दिलं आहे का? मराठ्यांचे दोन-चार माकडं फडणवीस यांच्या बाजूने बोलतात. त्यामुळे मराठा समाजात नाराजी आहे, असा हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. मनोज जरांगे पाटील नांदेड येथे पत्रकारांशी बोलत होते.

आज शांतता रॅलीचा चौथा दिवस आहे. आता तिसऱ्या जिल्ह्यात दौरा झाला आहे. राज्यातील मुलांना न्याय देण्यासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. आम्ही आमच्या मुलांच्या न्यायासाठी का रस्त्यावर येऊ नये? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे.

तसेच पुढे बोलताना म्हणाले, मुठभर मराठा नेत्यांना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीस संपूर्ण समाजाकडे दुर्लक्ष करत आहेत. पण जातीच्या लोकांनी त्यांना दाखवून दिलं आहे. तुम्ही नेत्यांना मोठं करा समाज तुम्हाला योग्यवेळी उत्तर देईल. मी अजूनही सांगतो देवेंद्र फडणवीस आमचे शत्रू नाहीत, मात्र त्यांनी आमच्या हक्काचे आरक्षण द्यावे, असा हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळ यांना जवळ केलं असून त्यांना बळ देतात, हे आता जनतेच्या लक्षात आलं आहे. फडणवीस यांनी भुजबळ यांना मंत्रीपद यासाठीच दिलं आहे का? मराठ्यांचे 2-4 माकड फडणवीस यांच्या बाजूने बोलतात. त्यामुळे मराठा समाजात नाराजी आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!