Jammu kashmir : जम्मू कश्मीर विधानसभेत आमदारांची हाणामारी! ३७० कलम विरोधात बॅनरबाजीने सत्ताधारी, विरोधी सदस्य भिडले..!!

Jammu kashmir : जम्मू आणि काश्मीरमध्ये ओमर अब्दुल्ला सरकार सत्तेत आले आहे. कलम ३७०वरून निवडणुकीतच वातावरण तापले होते. गेल्या दोन दिवसांपासून या मुद्दावर मोठा वाद सुरू आहे.
जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार बहाल करणारे कलम ३७०पुन्हा लागू करावे, या मागणीवरुन आज (दि.७) जम्मू-काश्मीर विधानसभेत राडा झाला. सत्ताधारी-विरोधी आमदारांमध्ये हाणामारी झाली. तसेच सभागृहात काही काळ प्रचंड तणाव निर्माण झाला. सभागृहाचे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले. Jammu kashmir
आज विधानसभेचे कामकाज सुरु होताच बारामुल्लाचे खासदार इंजिनियर रशीद यांचे बंधू, आमदार खुर्शीद अहमद शेख यांनी कलम३७० वर बॅनर सभागृहात दाखवले. त्यावर विरोधी पक्षनेते सुनील शर्मा यांनी तीव्र आक्षेप घेतला. सत्ताधारी-विरोधी आमदारांमध्ये हाणामारी झाली. सभागृहात काही काळ प्रचंड तणाव निर्माण झाला.सभागृहाचे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले.
सोमवार ४ नोव्हेंबर रोजीही विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याला विशेष दर्जा बहाल करणारे कलम ३७० पुनर्संचयित करण्याचा प्रस्ताव ‘पीडीपी’च्या आमदार वाहिद पारा यांनी मांडला. या प्रस्तावाला भाजपच्या आमदारांनी तीव्र निषेध केला होता.
यानंतर विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला होता. जम्मू-काश्मीर विधानसभेत पीडीपीचे आमदार वाहिद पारा यांनी कलम ३७० मागे घेण्याचा प्रस्ताव मांडला. जम्मू-काश्मीरला पुन्हा एकदा विशेष राज्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. विधानसभेत या प्रस्तावावरून भाजप आणि पीडीपी आमदारांमध्ये जोरदार वादावादी झाली होती.