जालिंदर कामठे, मुरलीधर निंबाळकर यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज पक्षप्रवेशाचा धमाका…

पुणे : आज शिवाजीनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात अन्य पक्षाच्या अनेक मान्यवरांनी जाहीर पक्ष प्रवेश केला. यामध्ये जालिंदरभाऊ कामठे, मुरलीधर निंबाळकर तसंच मारुती किंडरे, स्वाती चिटणीस, रोहन सुरवशे यांच्यासह अनेक महिला भगिनी व कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मार्गदर्शन केले. अजित पवार म्हणाले, मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, आपल्या पक्षाची विचारधारा समाजकल्याणावर आधारित असून ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्याची आहे, असं स्पष्ट केलं. पुण्यात सुरू असलेली मेट्रो लाईन व रेल्वे लाईनची कामं लवकरच मार्गी लागतील.

या सुविधांमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. तरुण कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात संधी मिळाली पाहिजे, कारण याच माध्यमातून योग्य कार्यकर्ते, योग्य पदाधिकारी घडतात आणि योग्य नेतृत्व घडतं, असं मत यानिमित्तानं व्यक्त केलं.
