Jalgaon Crime : महाराष्ट्रात पैशांचा पाऊस!! आता कारमध्ये आढळली दीड कोटी रुपयांची रोकड…


Jalgaon Crime : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. तसेच राज्यात आचारसंहिता देखील लागू झाली आहे.

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल-पारोळा मतदार संघातील कासोदा गावात पोलिसांच्या पथकाने नाकाबंदी दरम्यान मंगळवारी रात्री कारमधून दीड कोटींची रोकड जप्त केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विधानसभेचा बिगुल वाजला असून पोलीस प्रशासनातर्फे नाकाबंदी करण्यात आली आहे.

जिल्ह्यात या नाकाबंदीमध्ये अनेक वाहनांची तपासणी करण्यात येत असून कासोदानजीक एका वाहनातून रोकड पकडण्यात आली आहे. कासोदा गावातील फरकांडे चौफुलीवर पोलिसांचे पथक सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास नाकाबंदीसाठी थांबलेले होते.

याचवेळी एका क्रेटा कारची तपासणी केली असता पोलिसांना तब्बल एक कोटी ४५ लाखांची रोकड सापडली. याबाबत काल गुन्हा दाखल झाल्याची बातमी समोर आली आहे.

दरम्यान, रात्री उशिरापर्यंत ही रोकड नेमकी कोणाची आणि कशासाठी आणली होती? याचा खुलासा होऊ शकला नव्हता. परंतु या कारमधील रोकड एका बड्या राजकीय नेत्याशी संबंधित असल्याचीही जोरदार चर्चा आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!