लोकांचे खाऊन जेल मध्ये गेलायत ! लोकांचे खाऊन रक्त पिलो नाही ! जरांगे पाटील यांचे भुजबळांना प्रत्युत्तर …!


सांगली : मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी केलेल्या टीकेला मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी प्रतिउत्तर दिले आहे. मराठा समाजाने आता ठरवले आहे, आम्ही त्यांच्या कोणत्याही टीकेला उत्तर देणार नाही. त्यांना फक्त तेच काम उरले आहे. लोकांचे खाल्ल्याने ते आतमध्ये जाऊन आले आहेत. कोण कुणाचे खात आहे सर्वांना माहित आहे. त्यामुळे त्यांनी यावर बोलू नये.

आमच्यावर तुम्ही टीका केली तर, तुम्हाला उत्तर देण्यासाठी आम्ही काही कच्चे नाहीत. महाराष्ट्रात आम्ही वातावरण खराब होऊ देणार नाही. आम्ही देखील 50 टक्के आहोत, हे विसरू नका. तुम्ही लोकांचे पैसे खाता, रक्त पिता का? मग तुम्हाला कोण देव मानणार आहे. वयाने तुम्ही मोठे आहेत. आम्हाला तुमची माहिती बाहेर काढायला लावू नका. आम्ही देखील तुमचा बायोडेटा काढला आहे. उगीच धमक्या देऊ नयेत, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!