छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणात जयदीप आपटेला जामीन मंजूर, राजकीय वातावरण तापलं….

मुंबई : मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे याला अटक करण्यात आली होती. शुक्रवारी उच्च न्यायालयाने जयदीप आपटे याला जामीन मंजूर केला आहे. प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आता आपटेला कोठडीत ठेवण्याची गरज नाही,असे न्यायालयाने म्हटलं आहे.

मागच्यावर्षी ऑगस्ट महिन्यात मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता. नौदल दिनाच्या निमित्ताने ४ डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुर्णाकृती पुतळ्याच अनावरण झालं होतं. पुतळा उभा राहिल्यानंतर अवघ्या आठ महिन्यात कोसळला.
त्यावरुन महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं होतं. तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर विरोधी पक्षासह चहूबाजूंनी प्रचंड टीका झाली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटेला काही दिवसांनी अटक झाली होती. या जयदीपला आपटेला आता जामीन मंजूर झाला आहे. शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने जयदीप आपटेला जामीन मंजूर केला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे राजकोट किल्ला परिसरात शिवरायांचा पुतळा २६ ऑगस्ट २०२४ मध्ये कोसळला होता. अवघ्या आठ महिन्यांतच पुतळा कोसळल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात येत होता. या घटनेनंतर पुतळ्याचे बांधकाम निकृष्ट असल्याचे उघड झाले होते. पुतळा दुर्घटनेप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे याला कल्याण येथून अटक करण्यात आली होती.
पुतळा कोसळल्याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यातील चेतन पाटील या आरोपीला उच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वीच जामीन मंजूर केला होता. आता या प्रकरणातील दुसरा आरोपी जयदीप आपटे यालादेखील मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. कोर्टात सुनावणीवेळी आपटेचे वकील यांनी, निविदेतील अटीनुसार पुतळ्याच्या बांधकामाकरिता लागणाऱ्या साहित्यासाठी आपटे याने ४० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते.
