शिंदवणेत आय. टी तरुणांकडून शालेय मुलींना सॅनिटरी पॅड्स वाटप…! 


उरुळी कांचन : शिंदवणे येथील संत यादवबाबा माध्यमिक विद्यालयामधील मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने आय टी. क्षेत्रामधील तरुणांनी त्याच्या करीता मासिक पाळीपासून त्रास कमी होण्याच्या करीता भेट दिली आहे.

मुलींचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याकरीता वर्षभर पुरेल इतके सॅनिटरी पॅड्स भेट म्हणून देण्यात आलेला आहे. या भेटी करीता या आय टी क्षेत्रामधील तरुण व तरुणी संतोष जगताप, प्रशांत मोहिते, कल्पना पाटील, निखील मोहिते, प्रतिभा तरे, महादेव कोळे, अनिल पिंगळे, अस्मिता पाटील, नीता सरगर, माधव मोरे, गोपाळ कारंडे यांनी मदत केली.

तसेच शिवराज माने, मलतेश राव, कुबरसिंघ देऊरे, विशाल शाह, शशिकांत शिवणकर, सुनील वाघमारे यांनी वैयक्तिक वर्गणीद्वारे निधी संकलन केलेले आहे. याचा विद्यार्थीनीना फायदा होईल.

या गटातील सर्व तरुण नेहमीच सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी होत असतात. तरुणांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. याबाबत प्रकाश जगताप यांनी माहिती दिली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!