मोदींविरोधात अविश्वास! आज पाहिल्यांदाच अविश्वास ठरावाला सामोरे जाणार….


नवी दिल्ली : मोदी सरकारला मंगळवारी (ता. ८) दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या अविश्वास प्रस्तावाला सामोरे जावे लागणार आहे. लोकसभेच्या निवडणुका काही महिन्यांनी असल्याने आणि आकड्यांच्या दृष्टिकोनातून सरकारला कोणताही धोका नसल्यामुळे अविश्वास ठरावावरील चर्चा ही निवडणूक ठरणार आहे.

तसेच या अविश्वास प्रस्तावावर आज दुपारी १२ वाजता चर्चा होणार आहे. तीन दिवसांत १८ तास चर्चा होईल. त्याचवेळी १० ऑगस्टला पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्तावावर उत्तर देतील. तर भाजपकडून निशिकांत दुबे हे पहिले वक्ते असतील.

केंद्रातील मोदी सरकारविरोधात काँग्रेसने आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर मंगळवारी संसदेत चर्चा होणार असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व बहाल करण्यात आले आहे.

सरकारविरोधातील या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान त्यांनी पक्षाच्या वतीने प्रमुख वक्त्याची भूमिका बजावावी, अशी पक्षाची इच्छा असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. अशा स्थितीत राहुल लोकसभेत अविश्वास ठरावावर चर्चेला सुरुवात करू शकतात, अशी दाट शक्यता आहे.

दरम्यान विरोधकांवर हल्लाबोल करत सरकार आपल्या कामगिरीची गणना करेल. त्याचवेळी विरोधकांकडून आपल्या त्रुटी मोजून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जाईल.

हा प्रस्ताव मांडणाऱ्या गौरव गोगोई आपल्या ऐवजी राहुल गांधींना चर्चा सुरू करण्याविषयी सांगू शकतात अशी माहिती समोर आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!