धनंजय मुंडे यांनीच संतोष देशमुख यांचा खून करायला लावला!! आता भयंकर आरोपाने उडाली खळबळ…


बीड : महाराष्ट्रातल्या बीड या ठिकाणी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. त्यानंतर मस्साजोग हे गाव आणि देशमुख कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. तसेच याप्रकरणी वाल्मिक कराडवर मकोका दाखल करण्यात आला आहे.

वाल्मिक कराडवर मकोकाचा गुन्हा दाखल झाल्याने परळीमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. दोन दिवस कडकडीत बंद केलाय. सर्वत्र वातावरण पेटलेलं असताना मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांनी खळबळजनक आरोप केला आहे.

सरपंच संतोष देशमुख यांचा खून धनंजय देशमुख यांनी करायला लावल्याचा संशय आता येऊ लागल्याचं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे. एका मुलाखतीत बोलताना जरांगेंनी हा आरोप केला आहे.

वाल्मिक कराड सुटायला नको, बीडची केस अंडर ट्रायल चालवण्यात यावी. बीड मधील हत्या धनंजय मुंडे यांनी करायला लावली असा आम्हाला संशय आहे. खंडणीतून झालेल्या खून मध्ये धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा आम्हाला संशय आहे.

दरम्यान, खंडणीतले आरोपी, खुनातील आरोपी यांनी कोणाला फोन केले, कोणाला भेटले हे सगळे चार्जशीट मध्ये यायला पाहिजे असे देखील जरांगे पाटील म्हणालेत. ना जातीचं देणे घेणे नाही, फक्त पैसे पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी खंडणी आणि खुनातील सगळ्या आरोपींवर मकोका आणि ३०२ कलम लावला असे म्हणत हे पाप धनंजय मुंडेंचं आहे, पाप झाकण्यासाठी धनंजय मुंडे ओबीसींना मध्ये घेतोय असा हल्लबोल जरांगे यांनी मुंडे यांच्यावर बीड प्रकरणावरून केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!