IT Raid : बापरे! चप्पल व्यावसायिकाकडे मिळाली कोटींची संपत्ती, नोटा मोजून अधिकारीही थकले…..

IT Raid : आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात तब्बल ४० कोटी रुपयांची रोकड मिळाली आहे. उत्तर प्रदेशातील आग्रामधील चप्पल व्यावसायिकांच्या घरातून ही रक्कम मिळाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
नोटा मोजण्याचे यंत्र मागवून मोजणी सुरू करण्यात आली. या व्यावसायिकाकडून आतापर्यंत ४० कोटींहून अधिक रोख रक्कम मिळाली आहे. यासोबतच मोबाईल, लॅपटॉप आणि अनेक कागदपत्रांची तपासणी केली जात आहे.
आग्रामधील तीन बुटांच्या व्यापाऱ्यांवर छापा टाकण्यात आल्यानंतर ही रोकड मिळाली. यामध्ये ५०० रुपयांच्या देखील भरपूर नोटा आहेत. अधिकारी आता त्याची मोजणी करत आहेत. नोटांची एवढी रोकड बघून अधिकारी देखील थकले आहेत. मात्र, अजूनही ही मोजणी संपली नसल्याची माहिती आहे. IT Raid
४० कोटींची रोकड जप्त..
आग्रा येथे आयकर विभागाच्या पथकाने शनिवारी एका चप्पल व्यावसायिकाच्या घरावर छापा टाकला. या काळात चपला व्यावसायिकाच्या घरातून 40 कोटींहून अधिक रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
एवढी मोठी रोकड आली कुठून, या धंद्यात आणखी कोणाचा हात आहे? याप्रकरणी पथक रात्री उशिरापर्यंत चौकशी करत होते. याशिवाय अनेक महत्त्वाची कागदपत्रेही पथकाच्या हाती लागली आहेत.
दरम्यान, टीमने नोटा मोजण्यासाठी अनेक मशिन्स मागवल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत नोटा मोजण्याचे काम सुरू होते. मात्र, आणखी मोठी रोकड मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या हवाल्याने असे सांगितले जात आहे की, आयकर पथकाने बीके शूज, हरमिलाप शूज कंपनी आणि मंशु फूटवेअरच्या ठिकाणांहून जमिनीतील गुंतवणूक आणि सोने खरेदीशी संबंधित अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत.