पुण्यात २१ व्या मजल्यावरून आयटी अभियंता तरुणीची उडी, म्हणाला, मला माफ करा मी…!! घटनेने पुणे हादरलं

पुणे : पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली असून २१ व्या मजल्यावरून उडी घेत आय टी अभियंता असलेल्या एका तरुणीने आपलं आयुष्य संपवलं आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

या तरुणीनं आत्महत्या का केली? याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र नैराश्यातून या तरुणीनं टोकाचं पाऊल उचललं असावं असा प्राथमिक अंदाज आहे. अभिलाषा भाऊसाहेब कोथंबिरे असं या आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.
दरम्यान, घटनेबाबत अधिक माहिती अशी की, ‘सॉरी मला माफ करा, मी हे स्वच्छेने करत आहे, माझी आता जगायची इच्छा संपली आहे.’ अशी चिठ्ठी लिहून हिंजवडी मधील अभिलाषा भाऊसाहेब कोथंबिरे या आयटी अभियंता असलेल्या तरुणीने २१ व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे.

हिंजवडी येथील द क्राऊन ग्रीन सोसायटीच्या २१ व्या मजल्यावरून उडी घेत अभिलाषा कोथंबिरे या २५ वर्षीय तरुणीने आपलं जीवन संपवलं आहे. अभिलाषा घटनेच्या दिवशी पहाटे ४.३० सुमारास दुचाकीने सोसायटीच्या आवारात आली असता लिफ्टने २१ व्या मजल्यावर असलेल्या आपल्या घरी गेली, त्यानंतर पावने पाचच्या सुमारास तिने आत्महत्या केल्याचं निदर्शनास आलं आहे.
अभिलाषाच्या शव विच्छेदन अहवालामध्ये तिच्या काही अवयवांना गंभीर इजा झाल्यानं तिचा मृत्यू झाल्याचं म्हंटले आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी अभिलाषाच्या मृत्यूची आकस्मिक नोंद केली असून , या घटनेत कोणत्याही प्रकारचा घातपात अथवा संशयास्पद काही आढळून आले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे .