तिसरं महायुद्ध जवळ? इराणने केली जगाची कोंडी, नेमकं घडतंय काय?


अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यानंतर इराणने आक्रमक भूमिका घेत इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. इराणकडून इस्रायलच्या दिशेने किमान 30 क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. तेल हैफा आणि जेरुसलेम या शहरांवर इराणकडून हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे इस्रायलच्या अनेक भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. इस्रायली अधिकाऱ्यांनी जनतेला होम फ्रंट कमांडच्या सूचनांचं पालन करण्यास सांगितलं आहे.

असे असताना आता इराण आणि इस्त्रायलमधील लढाईत आता अमेरिकेने उडी घेतली आहे. इराणने जणून जगाची कोंडी केली आहे. त्यामुळे इंधन तुटवडा नाही तर इतरही अनेक वस्तूंचा व्यापार आणि वाहतुकीवर परिणाम होणार आहे. जगातील जवळपास 20 टक्के इंधन आणि गॅसचा पुरवठा, वाहतूक ही होर्मूज मार्गे होते.

अमेरिकेने फोर्डो, नतांज आणि इस्फहान, इराक मधील या तीन अणूऊर्जा प्रकल्पावर हल्ला केला. तर तिकडे इराणी संसदेने ‘स्ट्रेट ऑफ होर्मूज’ बंद करण्यास मंजूरी दिली. जलमार्गाच्या एका बाजूला इराणची सीमा तर दुसर्‍या बाजूला ओमान आणि UAE हे दोन देश आहेत. हा मार्ग पर्शियन आखाताला अरबी समुद्र आणि हिंद महासागराला जोडतो.

व्यापारावर विपरीत परिणाम होईल. काही वृत्तांनुसार, हा जलमार्ग ताब्यात घेण्यासाठी अमेरिका अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे. या ठिकाणी वचक ठेवण्याची अमेरिकेची जूनी रणनीती आहे. या जलमार्गावर जवळपास 33 कोटी 39 लाख लिटर कच्चा इंधनाचा पुरवठा करण्यात येतो. सर्वात अरूंद ठिकाणी 33 किलोमीटर रुंद असा कालवा इराणला अरबी द्वीपकल्पापासून स्वतंत्र करतो.

उत्तरेला इराण तर दक्षिणेला अरब सागर आहे. याच समुद्री मार्गाने एक तृतीयांश तेलवाहक जहाज जातात. आता इराणी संसदेने हा समुद्रीमार्ग बंद करण्यास मंजूरी दिल्याने एक प्रकारे नाकाबंदी झाली आहे. इराणने कोंडी केल्याने तेलाची, इंधनाची वाहतूक थांबेल आणि जगात इंधनाचे दर भडकतील, असे सांगितले जात आहे.

दरम्यान, या युद्धात दोन्ही देशांना खूप नुकसान सहन करावे लागले आहे. पण दोन्ही देश अजूनही थांबायला तयार नाहीत. दोन्ही देशांमधील सुरू असलेल्या युद्धामुळे तिसऱ्या महायुद्धाची भीती वाढली आहे. इस्रायल आणि इराणमध्ये युद्धबंदीची शक्यता कमी आहे, मात्र यामुळे प्रादेशिक अस्थिरता वाढत आहे. यामुळे याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!