देशात भाजपची लाट ओसरतेय? हिमाचल प्रदेश पाठोपाठ आता कर्नाटकची सत्ताही हातातून गेली

कर्नाटक : देशाचे लक्ष आज कर्नाटक विधानसभेचा निकाल काय लागणार याकडे होते. आज येथील निकाल जाहीर होत आहे. यामध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलांमध्ये काँग्रेस 132 जागांच्या जवळपास पोहचली आहे. तर भाजप (BJP) 63 जागांवर आघाडीवर आहे.
यामुळे हे राज्य देखील भाजपच्या हातातून गेले आहे. यामुळे सहा महिन्यांत सलग दुसऱ्यांदा भाजपला मोठा धक्का बसला आहे. हिमाचल प्रदेशपाठोपाठ आता कर्नाटकची सत्ताही भाजपच्या हातातून गेली आहे.
त्याचवेळी देशभरात राजकीय संकटाचा सामना करणाऱ्या काँग्रेसला मोठा विजय मिळाला. यामुळे कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे.
आधी हिमाचल प्रदेश आणि आता कर्नाटकच्या निवडणुका लागोपाठच्या निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना करणाऱ्या काँग्रेससाठी संजीवनी ठरू शकतात.
दरम्यान, कर्नाटकमध्ये आतापर्यत काँग्रेस आघाडीवर असल्याने कार्यकर्ते आनंदात आहेत. आता राज्यात जवळपास काँग्रेस सत्ता स्थापन करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, हे ऐतिहासिक बहुमत आहे. त्यामुळे काँग्रेससाठी कर्नाटकातील विजय अतिशय महत्त्वाचा आहे. दक्षिणेतील एकमेव राज्यात भाजपचे सरकार होते, ते सरकारही गेल्यामुळे भाजपसाठी हो धोक्याची घंटा मानली जात आहे.
कर्नाटकमध्ये भाजपने जोरदार प्रचार केला होता. केंद्रीय मंत्री याठिकाणी तळ ठोकून होते. मात्र भाजपचा याठिकाणी पराभव झाला आहे. यामुळे हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.