अजितदादांच्या विमान अपघाताच्या संशयाची सुई रोहित पवारांकडे? कुणी केले गंभीर आरोप?


पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात हा घातपात असल्याचा संशय वारंवार अजितदादांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या अपघातावर अनेक पत्रकार परिषदा घेऊन त्यांनी अनेक शंका देखील उपस्थित केल्या. मात्र दुसरीकडे त्यांच्याच विरोधात भाजपकडून मोठा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांनी या विमाना अपघाताचा संबंध आमदार रोहित पवार यांच्याशी संबंधित साखर कारखान्याशी जोडला आहे. या कारखान्यातून निघणाऱ्या धुरामुळे दृश्यमानता कमी होऊन हा अपघात झाला असावा का?असा संशय त्यांनी व्यक्त करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे.

भाजप युवा मोर्चाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले आहे. त्यात शेठफळ गडे येथील साखर कारखान्यामुळे प्रदूषण होत असल्याचा आरोप करत रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. या कारखान्यामुळे स्थानिक नागरिकांना श्वसनाचे आजार, डोळ्यांची जळजळ आणि त्वचेच्या तक्रारी भेडवसावत आहेत. शेतीवरही त्याचा परिणाम होत आहे. दादांच्या विमानाचा अपघात झाला. त्यादिवशी बारामती परिसात धुरामुळे दृष्यमानता कमी होती का? औद्योगिक उत्सर्जनामुळे कृत्रिम धुके तयार झाले होते का? याची वैज्ञानिक तपासणी होणे आवश्यक असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

दरम्यान या कारखान्याचा धूर विमानतळासाठी अडथळा ठरतो की नाही, याचे सादरीकरण रोहित पवार यांनी स्वतःहून करावे असे आव्हान युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष सोलनकरांनी दिले. तर रोहित पवार यांनी हे सर्व आरोप राजकीय द्वेषातून करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे. यावरून आता राजकीय वातावरण चांगलच तापत चालल आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!