इराण- इस्रायल युद्धाचा महाराष्ट्राला फटका! मुख्यमंत्री फडणवीस यांची महत्त्वाची बैठक,काय निर्णय घेणार?

पुणे : गेल्या एक महिन्यापासून सुरू असलेल्या इराण- इस्त्राईल युद्धाचा फटका महाराष्ट्राला बसला आहे.या आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत अनेक नवीन मोठे निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इराण आणि इस्रायल मध्ये सुरू असलेल्या या युद्धामुळे गेल्या काही दिवसांत राज्यात गॅस, पेट्रोल संदर्भात अनेक अफवा पसरवल्या गेल्या. त्यामुळे भारतीय नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं. गॅस तुटवड्याचा फायदा घेत सायबर भामट्यांनी संधी साधूपणा करत नागरिकांची फसवणूक देखील केली. तसेच पेट्रोल संपल्याच्या अफवेने अनेक जणांनी पंपावर कॅन, ड्रम घेऊन लांबलचक रांगा लावल्या. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांची आज सकाळी ११ वाजता महत्त्वाची बैठक घेणार आहेत.
या युद्धानंतर सोशल मीडियावर पसरत चाललेल्या अफवा खोटी असून पेट्रोल आणि गॅस सेवा सुरळीत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी काल झालेल्या बैठकीत म्हटले. तसेच देशात कोणत्याही प्रकारचा लॉकडाऊन नसल्याचे देखील त्यांनी म्हटले. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत.

या बैठकीत युद्धजन्य परिस्थितीवर तसेच राज्यातील परिस्थितीवर मुख्यमंत्री बोलणार आहेत. आता या बैठकीत कोणते नवीन निर्णय घेण्यात येतील हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.