वैष्णवी आत्महत्याप्रकरणी आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्या अडचणी वाढणार ; विधिमंडळ समितीच्या अहवालात सुपेकर यांच्यावर गंभीर निष्कर्ष….


पुणे : सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून वैष्णवी हगवणे या विवाहितेने आत्महत्या केली. या आत्महत्याप्रकरणी आता महत्त्वाची माहिती समोर आली असून आपला पहिला अहवाल महिला व बालकल्याण समितीने सरकारला सुपूर्द केला. या अहवालात हे प्रकरण दडपण्यासाठी दबाव आणणारे पोलिस अधिकारी म्हणजेच शशांक हगवणेचे मामा जालिंदर सुपेकर यांना सहआरोपी करण्याची आवश्यकता असल्याच म्हटल आहे.

विधिमंडळाच्या महिला व बालकांच्या हक्क आणि कल्याण समितीच्या अहवालात जालिंदर सुपेकर यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या समितीच्या पहिल्या अहवालात जालिंदर सुपेकरची सखोल चौकशी करून या प्रकरणी सहआरोपी करण्याची आवश्यकता असल्याचे देखील म्हटले आहे. या संदर्भात सखोल तपास करून सहभाग आढळल्यास निलंबित करावे व सहआरोपी करावे असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणाच्या तपासापासून जालिंदर सुपेकर यांना दूर ठेवावे, तसेच जी ध्वनिफीत प्रसारित झाली आहे, व्हायरल झाली आहे, तिची न्यायवैद्यक तपासणी करून सुपेकरांना निलंबित करून गुन्हा दाखल करावा तसेच सहआरोपी करावे असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!