IPS अंजना कृष्णा प्रकरण ; प्रशासनाच्या’ त्या’ अहवालाने अजित पवारांच्या अडचणी वाढणार..

सोलापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अंजना कृष्णा यांचा फोनवरील संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे माढा तालुक्यातील कुर्डू येथील मुरूम उपसा प्रकरण चांगलंच चर्चेत आल आहे. याप्रकरणी आता अजित पवारांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.कुर्डू मुरूम उत्खनन प्रकरणाचा अहवाल माढा तहसीलदारांनी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. या अहवालाने आता पुन्हा वादाला तोंड फुटले आहे.

कुर्डूतील मुरूम उत्खनन हे बेकायदेशीरच असल्याचा ठपका माढाच्या तहसीलदाराने पाठवलेल्या अहवालात म्हटले आहे. कुर्डू येथील गट क्रमांक 575-1 मध्ये 120 ब्रासचा मुरूम अवैधरित्या उत्खन्न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तहसीलदारांनी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना हा अहवाल पाठवला आहे. दादाराव माने यांच्या शेतातून हा मुरूम उत्खनन करण्यात आला आहे. उत्खनन केलेला मुरूम हा शिराळ कुर्डू अंबड येथील पाणंद रस्त्यासाठी वापरण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.या प्रकरणात 2024 साली आदेश देण्यात आले होते. पण त्याला मुदतवाढ देण्यात आली नव्हती. मुरूम उत्खनन गटातून बेकायदेशीररित्या हा मुरूम उत्खनन केल्याचे गटविकास अधिकाऱ्यांनी तहसीलदारांना पाठवलेल्या अहवालात म्हटले आहे.
आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना कारवाईपासून रोखण्यासाठी केलेल्या कॉलमुळे अजितदादा वादात सापडले होते. त्यांच्याविरोधात टीकेची झोड उठली होती. आता या मुरूम प्रकरणी तहसीलदारांनी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या अहवालाने खळबळ उडाली आहे
