IPL Auction 2024 : पॅट कमिन्स ठरला आयपीएल इतिहासातील दुसरा महागडा खेळाडू, लागली ‘इतक्या’ कोटींची बोली, जाणून घ्या..


IPL Auction 2024 : आयपीएल इतिहासातील दुसरी सर्वात मोठी बोली लागली आहे. ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कॅप्टन पॅट कमिन्स याच्यावर सनराईझर्स हैदराबादने पैश्यांची उधळण केली आहे. हैदराबादने तब्बल २० कोटी ५० लाखात पॅट कमिन्सला संघात सामावून घेतलं आहे. त्यामुळे आता हैदराबादला नवा कॅप्टन मिळाला आहे. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

पॅट कमिन्सची मूळ किंमत २ कोटी रुपये होती, त्याच्यासाठी सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात चुरशीची लढत झाली. स्टार अष्टपैलू पॅट कमिन्स हा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार असून अलीकडेच त्याच्या नेतृत्वाखाली संघाने एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे. IPL Auction 2024

पॅट कमिन्सची बोली २ कोटी रुपयांपासून सुरू झाली, जेव्हा सनरायझर्स हैदराबादने त्याच्यासाठी पहिली बोली लावली आणि नंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या बोलीमध्ये सामील झाले. सनरायझर्स हैदराबादने पॅट कमिन्ससाठी आपली बोली सोडली नाही आणि शेवटी त्याला २०.५० कोटी रुपयांना विकत घेतले.

पॅट कमिन्सने आयपीएलमध्ये केवळ ४२ सामने खेळले आहेत, त्याच्या नावावर ३७९ धावा आहेत आणि त्याने केवळ ४५ विकेट घेतल्या आहेत. म्हणजेच विक्रमी सरासरी असतानाही पॅट कमिन्सवर एवढा पैसा बरसला आहे, अशा स्थितीत हैदराबादने मोठा जुगार खेळला आहे, असे म्हणता येईल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!