IPL होणार स्थगित? बड्या खेळाडूला कोरोना झाल्याने उडाली एकच खळबळ….!
मुंबई : सध्या आयपीएल 2023 स्पर्धेवर कोरोनाचे संकट घोंगावत आहे. त्यामुळे आयपीएल 2021 प्रमाणे पुन्हा एकदा आयपीएल स्पर्धा स्थगित करावी लागते की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. सध्या भारतात रुग्ण वाढू लागले आहेत.
आता माजी खेळाडू क्रिकेट समालोचक आणि तज्ज्ञ असलेल्या आकाश चोप्राला कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती स्वत: आकाश चोप्रा याने दिली आहे. त्यामुळे काही दिवस आकाश चोप्रा समालोचन करताना दिसणार नाही. यामुळे स्पर्धेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आयपीएल 2021 मध्ये काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर लीग मध्येच स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर उर्वरित सामने युएईत खेळवण्यात आले होते. यामुळे सध्या असे काही होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आयपीएल 2023 स्पर्धा आता सुरु असून आतापर्यंत फक्त 6 सामने खेळवले गेले आहेत. यामुळे अजून मोठ्या प्रमाणावर स्पर्धा शिल्लक आहे. 21 मे पर्यंत एकूण 70 सामने होणार आहेत. त्यानंतर प्लेऑफ आणि अंतिम फेरीचा सामना असेल.