दौंडमध्ये जिल्ह्यातील सत्ताधारी आमदाराच्या भावाकडून तमाशा थिएटरमध्ये गोळीबाराचा तपास सुरू! यवत पोलिसांकडून अद्याप स्पष्टीकरण नाही …

दौंड : पुणे जिल्ह्यातील एका आमदाराच्या भावाने दौंड तालुक्यातील तमाशा थेएटरमध्ये राडा घालून थिएटरवर गोळीबार केल्याचा प्रकाराची जोरदार चर्चा दौंड तालुक्यात असून घटना खरी की खोटी म्हणून या प्रकरणाचा तपास पोलिस करीत आहेत.

ही घटना दौंड तालुक्यातील एका थिएटरमध्ये घडल्याची चर्चा असून यवत पोलिसांनी मात्र या घटनेला अद्याप पुष्टी दिली नसून घटना घडली का म्हणून तपास सुरू आहे. याबाबत सत्ताधारी महायुतीच्या एका आमदाराचा भावाचे नाव जोडले जात असून आणि त्याच्या मित्रांनी राडा केल्याची माहिती समोर आली आहे.
Views:
[jp_post_view]