हायवा ट्रक चोरीतील आंतरराज्यीय गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखा व यवत पोलिसांकडून अटक, मुद्देमालही केला जप्त…

यवत : काही दिवसांपूर्वी यवत पोलीस स्टेशन हद्दीतून एक हायवा ट्रक चोरीस गेला होता. त्यावरुन यवत यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेने सदर गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरु करण्यात आला. याबाबत
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गावडे, घाडगे, भुजबळ तसेच यवत पोलीस स्टेशनचे गायकवाड, यादव यांनी हायवा ट्रक चोरी प्रकरणी सुमारे २०० किलोमीटर अंतराचे सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले. तसेच सोबत तांत्रीक विश्लेषणाचे आधार घेवून आरोपींची माहीती प्राप्त करून सदरचे आरोपी हे मोहोळ, सोलापूर या ठिकाणी असलेबाबत माहीती मिळालेने मोहोळ येथे जाउन सापळा रचून आरोपीला अटक केली.
त्याच्याकडून स्वीफ्ट डीझायर गाडीही ताब्यात घेतली. तसेच गणेश अरूण राउत, धनाजी नागनाथ लोकरे, दत्तात्रेय सदाशीव जाधव, लक्षमण नामदेव चौरे, अशी नावे पुढे आली. तसेच चोरलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांना पुढील तपासकामी आरोपींना यवत पोलीस येथे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी ही पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, पोलीस उपअधीक्षक बापूराव दडस उपविभाग दौंड, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, नारायण देशमुख यवत पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शना खाली केली.