कुरकुंभ येथील इंटीग्रेटेड फर्टिलायझर कंपनीने कामगारांना कामावरून काढले, नेमकं कारण काय? कामगारांचे आज आंदोलन…


दौंड : येथील कुरकुंभ औद्योगिक वसाहतील इंटीग्रेटेड फर्टिलायझर अॅण्ड केमिकल प्रा. लि. कंपनीने सहा कामगारांना कामावरून काढून टाकले आहे. याबाबत मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेच्या वतीने कंपनीसमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष भारत सरोदे यांनी दिला आहे.

याबाबत त्यांनी दौंड तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. नियम धाब्यावर बसवून नियमित काम करणाऱ्या कामगारांना या कंपनीच्या व्यवस्थापकांनी सन २०२४ रोजी अचानक कामावरून काढून टाकले आहे. यामुळे याबाबत जाब विचारला जात आहे.

या संदर्भात कामगारांना न्याय मिळण्यासाठी संघटनेने पुणे कामगार उपायुक्त यांच्याकडे लेखी तक्रार केली. यासंदर्भात कामगार उपायुक्त यांनी संबंधित कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

याबाबत कामगारांना कामावरून काढून टाकल्याच्या संदर्भात कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ठोस करणे दिली नाहीत. त्यामुळे कंपनीने कामगारांना पुन्हा कामावर घेऊन ऑगस्ट २०२४ ते आजपर्यंत पगार, बोनस व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी संघटनेने निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या मागण्यांसाठी आज कंपनीला टाळे ठोको आंदोलन करण्यात येणार आहे. दौंडचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी अरुण शेलार यांनीही संबंधित कंपनीला नोटीस बजावली आहे. यामुळे कामगारांना न्याय मिळणार का? हे लवकरच समजेल.

संघटनेच्या मागण्यांसंदर्भात लवकर चर्चा करून आंदोलनापासून परावृत्त करावे अशा सूचना नोटिसाद्वारे दिल्या आहेत. याबाबत आता कामगार आक्रमक झाले आहेत. याठिकाणी कामगारांवर मोठा दबाव असल्याचे देखील सांगितले जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!