दौंडमधील सामूहिक हत्याकांड स्थळाची पोलीस महानिरीक्षक यांची पाहणी ! शवविच्छेदन अहवालातील त्रूटी शोधून काढणार…!


दौंड : दौंड येथील मजुरी करणाऱ्या एकाच कुटुंबातील सात जणांचे खून करणाऱ्या आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली दोन वाहने पोलिसांनी जप्त केली. सध्या या प्रकरणी रोज नवीन माहिती समोर येत आहे.

सामूहिक हत्याकांड प्रकरणात ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने पाच जणांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे. सामूहिक हत्याकांड प्रकरणातील आरोपींची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.

शनिवारी सकाळी हे हत्याकांड घडलेल्या स्थळाची पाहणी कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी केली आहे. या पाहणीत मृतदेह शवविच्छेदनात झालेल्या त्रुटी शोधण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाकडून करण्यात येईल तसेच फॉरेसिक व मेडीकल पथकाकडून शिवविच्छेदन अहवाल घेऊन या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येईल असे ते म्हणाले.

आरोपींनी सात जणांचे खून करून मृतदेह भीमा नदीपात्रात टाकले. त्यासाठी एका गाडीचा वापर करण्यात आल्याचा संशय आहे. आरोपींकडून एक मालवाहू गाडी आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी राहुल धस, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे तपास करत आहेत.

सामूहिक हत्याकांड प्रकरणात आणखी काही जण सामील असल्याचा संशय असून त्या दृष्टीने तपास करण्यात येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!