दुखापत खांद्याला अन रुग्णाचा मृत्यू ! नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये नेमके काय घडलं !!
नागपूर : कामठी रोडवरील आशा रुग्णालयात एक खांद्याला दुखापत झालेला रुग्ण दाखल झाला होता. .मात्र डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करताच त्याचा मृत्यू झाल्याने नातेवाईक संतप्त झाले आहेत . हा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने झाल्याचा आरोप करत त्यांनी गोंधळ घातला. परंतु, रुग्णालयाकडून रुग्णावर योग्य उपचार झाल्याचे सांगण्यात आले.
या घटनेची सविस्तर माहिती अशी कि ,बादल सुंदरलाल पाटील (३२रा. हिवरा रोड, संजीवनी नगर, कांद्री, कन्हान )असे दगावलेल्या रुग्णाचे नाव आहे. तो गोंदियातील श्री कृष्णा डायग्नोसिस अँड सिटी स्कॅन सेंटरमध्ये कर्मचारी होता. सात नोव्हेंबर रोजी रात्री पडल्यामुळे त्यांच्या खांद्याला दुखापत झाली होती. ८ नोव्हेंबरला त्यांना कन्हानच्या रुग्णालयात तर ९ नोव्हेंबरला आशा रुग्णालयात दाखल केले गेले. डॉक्टरांनी ११ नोव्हेंबरला बादलच्या खांद्यावर शस्त्रक्रिया केली.
शस्त्रक्रियेनंतर अचानक रुग्णाची प्रकृती खालावली. १२ नोव्हेंबरला त्यांचा मृत्यू झाला. पायी रुग्णालयात आलेल्या रुग्णाचा जीव डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप करत रुग्णांनी रुग्णालयात गोंधळ घातला. पोलिसांनी वेळीच बंदोबस्त वाढवल्याने अनुचित प्रकार टळला आहे . मात्र खांद्याला दुखापत होऊन रुग्ण अचानक दगावल्याने हॉस्पिटलच्या उपचारावर संशय उत्पन्न झाला आहे. न्यू कामठी पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दाखल झाली आहे. या विषयावर प्रसिद्धीमाध्यमाला पोलीस निरीक्षक प्रमोद मोरे म्हणाले, या प्रकरणाची तक्रार आली असल्याचे मान्य करत शवविच्छेदन अहवालानंतरच रुग्णाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याचे सांगितले.