वारकऱ्यांवर अमानुष लाठीचार्ज कुणाच्या इशाऱ्याने? पुण्यात आमदार रवींद्र धंगेकर उतरले रस्त्यावर

पुणे : रविवारी पालखी सोहळा पंढरपूरकडे रवाना झाला आहे. यामध्ये आळंदीत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा सुरू असताना वारकरी आणि पोलिसांमध्ये वाद झाला. यावेळी पोलिसांनी वारकऱ्यांना मारहाण केल्याचे सांगितले जात आहे.

याचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत. असे असताना आता वारकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आता काँग्रेस रिंगणात उतरले आहे. वारकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्ज कुणाच्या इशाऱ्याने करण्यात आला? या लाठीचार्ज करून वारकऱ्यांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला.


वारकऱ्यांच्या सन्मानासाठी पुण्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने सन्मान दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केला.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, आमदार रवींद्र धंगेकर, माजी गृहमंत्री आमदार रमेश बागवे उपस्थित होते. हातात आम्ही वारकऱ्यांच्या सन्मान करतो, आमची संस्कृती वारकरी संप्रदाय, महाराष्ट्राचा अभिमान, असे फलक घेऊन वारकऱ्यांना पाठिंबा दर्शविला.
दरम्यान, या घटनेवर उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आळंदी येथे कोणताही लाठीचार्ज झालेला नाही, त्यामुळे न घडलेल्या घटनेचे राजकारण करू नका. असे त्यांनी म्हटले आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
असे असताना आता मारहाण झालेल्या या वारकऱ्याचा व्हिडिओ हायरल होत आहे. जवळपास १५ ते २० पोलिसांनी चार वारकऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप विशाल रावसाहेब पाटील या तरुण वारकऱ्याचे केला आहे.
