२०२६ च्या पहिल्या दिवशी महागाईचा भडका! LPG सिलिंडरच्या किंमती वाढल्या, जाणून घ्या नवे दर..


पुणे : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सामान्य नागरिकांसह व्यापाऱ्यांना महागाईचा मोठा धक्का बसला आहे. १ जानेवारी २०२६ पासून तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ केली असून, देशभरात व्यावसायिक गॅस सिलिंडर महाग झाला आहे.

दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईसारख्या प्रमुख शहरांमध्ये ही दरवाढ लागू झाली असून, त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, कॅन्टीन आणि लहान व्यावसायिकांवर आर्थिक ताण वाढण्याची शक्यता आहे.

दरवाढीनंतर देशातील प्रमुख महानगरांमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत १५३१.५० रुपयांना मिळणारा १९ किलोचा कमर्शियल एलपीजी सिलिंडर आता १६४२.५० रुपयांना मिळणार आहे. दिल्लीमध्ये याची किंमत १५८०.५०रुपयांवरून थेट १६१९.५० रुपये करण्यात आली आहे, ज्यामुळे राजधानीतील व्यावसायिकांवर खर्चाचा बोजा वाढणार आहे.

       

कोलकातामध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत १६८४ रुपयांवरून वाढवून १७९५ रुपये करण्यात आली आहे. तर चेन्नईमध्ये याची किंमत १७३९.५० रुपयांवरून १८४९.५०रुपये इतकी झाली आहे. या दरवाढीचा थेट परिणाम हॉटेल व्यवसाय, खाद्यपदार्थ विक्रेते आणि लघुउद्योगांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

घरगुती गॅसचा हिशोब काय?

देशातील बहुतेक शहरांमध्ये घरगुती गॅसचे दर जवळपास ८५० रुपये ते ९६० रुपयांच्या दरम्यान आहेत. सध्या दिल्लीमध्ये घरगुती एलपीजी सिलेंडर 853 रुपयांना मिळत आहे, तर मुंबईमध्ये याची किंमत ८५२.५० रुपये आहे. लखनऊमध्ये सिलेंडर ८९०.५० रुपये, अहमदाबादमध्ये 860 रुपये आणि हैदराबादमध्ये ९०५ रुपयांना मिळत आहे. तर, वाराणसीमध्ये याची किंमत ९१६. ५० रुपये आणि पटनामध्ये ९५१ रुपये नोंदवण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!