भारतीय रेल्वेच्या तिकिट दरात वाढ! आजपासून नवे दर लागू,जाणून घ्या किती वाढलं भाडं..

पुणे : जर तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. भारतीय रेल्वेने १ जुलै २०२५ पासून मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
आज म्हणजेच १ जुलैपासून देशभरात मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या तिकीट दरात किरकोळ वाढ करण्यात आली आहे. ही वाढ जरी प्रती किलोमीटर फारशी मोठी वाटत नसली, तरी लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर त्याचा सरळ आर्थिक परिणाम होणार आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, या भाडेवाढीचा लोकल प्रवाशांवर किंवा मासिक पासधारकांवर परिणाम होणार नाही. फक्त मेल/एक्सप्रेस आणि लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी ही दरवाढ लागू करण्यात आली आहे.
500 किमीपेक्षा अधिक प्रवास करणाऱ्यांसाठी….
सामान्य दुसरी श्रेणी: प्रति किलोमीटर 0.50 पैसे वाढ, मेल/एक्सप्रेस नॉन-एसी: प्रति किलोमीटर 1 पैसा वाढ, एसी क्लास (स्लीपर, 3-टायर, चेअर कार): प्रति किलोमीटर 2 पैसे वाढ
सामान्य दुसऱ्या श्रेणीचे दर यथास्थित राहणार
लोकल ट्रेन प्रवासी आणि मासिक पासधारकांसाठी..
कोणतीही वाढ नाही, दर कायम राहणार..
उदाहरणार्थ – किती जास्त मोजावे लागेल?
जर तुम्ही 1,000 किलोमीटर प्रवास करत असाल, आणि नॉन-एसी मेल/एक्सप्रेस गाडीने जात असाल, तर तुम्हाला 10 रुपये जास्त मोजावे लागतील. तसेच एसी प्रवासासाठी तेच अंतर असेल तर 20 रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते.