भारतीय डाक सेवेची संधी ! ३५ हजार रिक्त पदे भरण्यासाठी मंजुरी ….
india post payments bank : भारतीय डाक विभागात नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. आता लवकरच हे स्वप्न पूर्ण होणार आहे. पोस्ट ऑफिसमध्ये 35 हजार पदांसाठी भरती होणार आल्याची माहिती मिळत आहे. या भरती प्रक्रियेबद्दलची नोटीस नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊया या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती.
इंडिया पोस्टने ग्रामीण डाक सेवकाच्या (GDS) पदांसाठी ही भरती प्रक्रिया जाहीर केलीये. 15 जुलै 2024 पासून भरती प्रक्रियेची प्रक्रिया सुरू होईल आणि सविस्तर माहिती देखील मिळणार आहे. यानंतर तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी र्ज करू शकतात. या भरती संदर्भात लिंक ओपन झाल्यानंतर उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकतात.
indiapostgdsonline.gov.in. या साईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. या ठिकाणी तुम्हाला सर्व सविस्तर माहिती मिळेल. अर्ज करण्यासाठी लिंक अजून सुरू झाली नसून 15 जुलैनंतर तुम्ही अर्ज करू शकता. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट लागू करण्यात आली असून दहावी पास उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकतात. त्याचबरोबर उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असणे देखील आवश्यक आहे.
उमेदवाराला सायकल देखील चालवता आली पाहिजे. या भरती प्रक्रियेसाठी 18 ते 40 वयोगटापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात. 35 हजारांपेक्षाही अधिक पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातं आहे. उमेदवारांची निवड ही गुणवत्तेच्या आधारावर केली जाणार आहे. त्यानंतर कागदपत्र पडताळणी होईल.
Views:
[jp_post_view]