भारतीय नौदल सज्ज!! पाकिस्तानला दिला थेट इशारा, समुद्रात सराव, आता युद्ध अटळ?

मुंबई : पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. यामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताने काही धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. सिंधु जल कराराला स्थगिती दिली आहे. राफेल, सुखोई या लढाऊ विमानांचा युद्धाभ्यास सुरू केला आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये धाकधूक वाढली आहे.
भारतीय लष्कर आणि नौदल देखील पूर्ण तयारीत आहे. यामध्ये भारतीय नौदलाने एक ट्वीट केले आहे. ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एक्सवर भारतीय नौदलाने MissionReady, Anytime, Anywhere, Anyhow! अशा प्रकारची पोस्ट केली आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.
या पोस्टचे अनेक प्रकारचे अर्थ काढले जात आहेत. भारत काहीतरी मोठे करणार अशी भीती पाकिस्तानला वाटत आहे. भारत पाकिस्तानविरुद्ध मोठे पाऊल उचलणार असे म्हटले जात आहे. तर कोणत्याही कारवाईसाठी भारतीय लष्कर, नौदल आणि वायुसेना पूर्णपणे तयार असल्याचे म्हटले जात आहे.
भारतीय नौदल आणि लष्कराने एक्स या सोशल मिडिया अकाऊंटवरुण पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा दिला आहे. भारत हल्ला करण्याची भीती पाकिस्तानला वाटत आहे. भारताने पाकिस्तानविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. आक्रमण युद्धाभ्यास सुरू केला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.