इंडिया की भारत.? ‘X’ वर ‘भारत’चा ट्रेंड, लाखो लोकांकडून वापरला कीवर्ड….


नवी दिल्ली : सध्या देशात इंडिया आणि भारत हे दोन्ही नाव खूप चर्चेत आले आहेत. भारतीय राज्यघटनेतून ‘इंडिया’ हे नाव काढले जाणार आहे आणि त्याऐवजी भारत हे नाव करण्यात येणार आहे, अशी मोठी चर्चा मंगळवारी सर्वच माध्यमांमध्ये रंगली होती.

सोशल मीडिया एक्सवर मंगळवारी (ता. ५) ‘भारत’ हा सर्वाधिक शोधला जाणारा कीवर्ड होता. त्या दिवशी भारत हा जगात सर्वाधिक वापरला जाणारा कीवर्ड होता. ट्विटरवर ४ लाख ७४ हजार युजर्सनी भारत हा कीवर्ड वापरला आहे. जाणून घ्या भारत का चर्चेत आहे.

सर्वाधिक वापरला जाणारा कीवर्ड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एस्कवर मंगळवारी (ता.५) ‘भारत’ हा सर्वाधिक सर्च केलेला कीवर्ड होता. ‘भारत’ हा कीवर्ड आज जगभरात सर्वाधिक वापरला गेला. जो एक रेकॉर्ड बनला आहे, असे अमर उजालाने म्हटले आहे. ‘X’ वर, जगभरातील वापरकर्त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये ‘भारत’ हा कीवर्ड ४ लाख ७४ हजार वेळा वापरला आहे.

‘भारत’ हा कीवर्ड अचानक ट्रेंडिंग का?

G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रभती भवनातून आलेल्या अधिकृत निमंत्रण पत्रिकेवर “प्रेसिडेंट ऑफ इंडिया” ऐवजी “प्रेसिडेंट ऑफ भारत” असा उल्लेख करण्यात आला आहे.

यावरून देशातील राजकारण तापले आहे. नामांतराच्‍या मुद्यावर विरोधी आघाडीतील अनेक पक्ष आक्रमक झाले असून, यावर संमिश्र प्रतिक्रिया विविध क्षेत्रातून व्‍यक्‍त हाेत आहेत सध्या ट्विटरवर ‘भारत’चा ट्रेंड सुरु आहे.

हे आहेत सर्वाधिक वापरलेले कीवर्ड आहेत

भारत: 474k
Beyonce: 350k
कलम 1: 284k
शिक्षक दिन: 165k

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!