भारत जागतिक महासत्ता म्हणून उभा राहत आहे; भारतीयांनी आपल्या कर्तव्याचे पालन करावे – माजी खासदार अमर साबळे; उरुळीकांचन येथे ७६ प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न…

उरुळी कांचन : उरुळी कांचन येथील अजिंक्य चॅरिटेबल फाउंडेशन संचालित डॉ.अस्मिता प्राध्यामिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय डॉ. अस्मिता इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम (CBSE) स्कूल महादेव कांचन, फार्मसी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमान २६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९ वाजता ७६ वा प्रजासत्ताक दिन राज्यसभेचे खासदार अमर सावळे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.
सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव डॉ अजिंक्य कांचन उपस्थित होते.
विद्यार्थिनींनी मान्यवरांना मानवंदना देऊन कवायत, लेझीम सादर केली. तसेच काही विद्यार्थ्यांची भाषणे झाली. जागरण गोंधळ विठ्ठलाची वारी, जय सिताराम गीत, देशभक्तीवर नृत्य, तसेच आंध्र प्रदेश मध्य महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व केलेल्या युवा महोत्सवातील विद्यार्थ्यांचा सत्कार, तसेच जय मल्हार मध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार, ऑलम्पिक मधील विद्यार्थ्यांचा सत्कार, सभाळ करंडक क्रिकेट स्पर्धेतील उपविजेता संघ, जिल्हा विजेता क्रिकेट संघ तसेच दहावी, बारावी गुणवत्ता विद्यार्थी, आदर्श शिक्षक, यांचाही सन्मान मान्यवरांच्या शुभहस्ते झाला.
माजी खा. अमर साबळे साहेब यांनी देशाचे संविधान हे किती महान आहे. तसेच नागरिकांनी मूलभूत हक्काबरोबर आपल्या कर्तव्याचे पालन केले पाहिजे. देश सर्व स्तरावरील अनेक ठिकाणी यश संपादन करत आहे. त्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. भारतीय लोकशाहीचे संपूर्ण जग अनुकरण करत आहे. आणि भविष्यात भारत जगाची महासत्ता बनेल असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अजिंक्य कांचन यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या सर्व कार्यक्रमाचे अभिनंदन करून विद्यार्थ्यांनी सक्षम, देश प्रेमी व देशाभिमानी बनला पाहिजे आजचा तरुण हा उद्याच्या उज्वल भारताचा खरा पाया आहे. त्यामुळे हा तरुण सक्षम बनला पाहिजे. विद्यार्थ्यांना कला क्रीडा शैक्षणिक क्षेत्रात जेवढी मदत लागेल ती संस्था करेल असा विश्वास त्यांनी दिला आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ जगदाळे सर यांनी केले व संपूर्ण शैक्षणिक संकुलाचा आढावा घेताना हे संकुल एक सायन्स हब असून भविष्यात याचा वटवृक्ष होईल. असा आशावाद व्यक्त केला आहे.
सदर कार्यक्रमास प्रतिभा प्रतिभाताई कांचन, ऋतुजा कांचन, डॉ अस्मिता कांचन – बहिरट , आर्किटेक्चर अमित नाईक, प्राचार्य डॉ. नितीन गवई, प्राचार्य रोहिणी जगताप, प्राचार्य योगिनी धारवाडकर, विभाग प्रमुख नानासाहेब परभणे. सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि भव्य संख्या पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सूत्रसंचालन अर्जुन कर मॅडम व शेलार मॅडम यांनी केले. तर आभार नानासाहेब परभणे यांनी मांडले.
दरम्यान उरुळीकांचन परिसरात उरुळीकांचन पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले, यावेळी आकर्षक फुलांची सजावट करुन राष्ट्रगायन झाले. महात्मा गांधी विद्यालयात पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महादेव कांचन उपस्थित होते. टिळेकरवाडी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच गणेश टिळेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.सरपंच सुभाष लोणकर उपस्थित होते.